राजूर (कॉलरी) येथे जुगार खेळताना सात जणांना अटक

47

जितेंद्र कोठारी, वणी : पोलीस स्टेशन हद्दीत राजूर (कॉलरी) येथे सार्वजनिक जागेवर जुगार खेळताना 7 इसमाना वणी पोलिसांनी अटक केली आहे. सहा.पो. नि. दत्ता पेंडकर यांनी पोलीस स्टाफसह टाकलेल्या धाडीत जुगाऱ्याकडून 1 लाख 51 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

राजूर (कॉलरी) येथील वेकोलिच्या 96 नंबरच्या पडक्या इमारती समोर मोकळ्या जागेवर काही इसम मांग पत्यावर पैशाची बाजी लावून हारजीत खेळत असल्याची गोपनीय माहितीवरून सहा. पो. नि. दत्ता पेंडकर यांनी पोलीस स्टाफसह रविवार 23 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजता सदर ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी जुगार खेळताना पोलिसांनी श्रीराम नारायण डवरे (60), शुभम माणिक खैरे (26), राजेंद्र बाबूलाल केवट (42), नानाजी गणपत झाडे (60), डोमा परसराम कांबळे (70), अमरदीप प्रकाश नगराळे (36) व प्रशिल दिलीप कांबळे (32) सर्व राहणार राजूर कॉलरी ता. वणी यांना पोलिसांनी अटक केली. 

अटकेतील आरोपीकडून पोलिसांनी 52 पत्यासह रोख 6 हजार 700 व 4 दुचाकी किंमत 1 लाख 45 हजार असे एकूण 1 लाख 51 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फिर्यादी सपोनि दत्ता पेंडकर यांच्या फिर्याद वरुन सर्व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.