लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची अविरोध निवड

69

जितेंद्र कोठारी, वणी : प्रतिष्ठित सामाजिक संस्था लायन्स क्लबची निवडणूक नुकतेच शनिवार 24 जून रोजी पार पडली. देशमुखवाडी स्थित लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल सभागृहात पार पडलेल्या या निवडणुकीत लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष पदावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची पुढील 2 वर्षासाठी अविरोध निवड करण्यात आली. तर लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून राजाभाऊ पाथ्रडकर यांची निवड करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

लायन्स क्लबच्या माध्यमातून शहरात लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना करण्यात आली होती. कालांतरमध्ये शाळा संचालन करण्यासाठी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टची वेगळी स्थापना करण्यात आली. तर लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य अविरत चालू ठेवण्यात आले. लायन्स चॅरिटेबल ट्रस्टमध्ये 17 संचालकांची कार्यकारिणी आहे. सुरुवातीला देशमुखवाडी येथे लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल संचालित करणाऱ्या या संस्थेतर्फे शहरातील नांदेपेरा मार्गावर ज्युनिअर व सिनियर कॉलेज सुरु करण्यात आले. सद्य लायन्स शाळांमध्ये 2200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष पदावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची निवड झाल्याने पालकवर्ग आनंदित झाले आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.