मध्यरात्री वणी पोलिसांनी राबविली ‘वॉश आऊट’ मोहीम

31

जितेंद्र कोठारी, वणी : बिना जमानती वॉरंट (Non bailable) मधील फरार आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यासाठी वणी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री दरम्यान शहरात वॉश आऊट मोहीम राबविली. ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी बिना जमानत फरार असलेले 17 पैकी 9 आरोपींना अटक केली. अटकेतील आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता वारंवार समन्स बजावून न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या 5 आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली.

ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांचे मार्गदर्शनात पोलिस नायक मुकेश करपते, अजित पंधरे व पोलिस कॉन्स्टेबल श्रीनिवास गोनलावार यांचे पथक तयार करण्यात आले. पथकाने रविवारी मध्यरात्री शहरात विविध ठिकाणी धाडसत्र राबवून 17 पैकी 9 आरोपींना अटक केली. अटक आरोपींपैकी सुहास सखाराम उगले (54) राहणार वार्ड क्रमांक 2, राजूर कॉलरी, शेख जावेद उर्फ सकाट्या अब्दुल खलील (40), रा. गोकुळ नगर वणी, सागर मोहन संदुरकर (35), रा शास्त्रीनगर वणी, विनोद गुलाब चौधरी (38) रा. रामपुरा वार्ड वणी व शेख सलीम शेख गफ्फार (37) रा. शास्त्रीनगर वणी यांची न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली.

सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांचे मार्गदर्शनात पो. ना. मुकेश करपते, अजित पंधरे व पो. कॉ. श्रीनिवास गोनलावार यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.