हेलपींग हँड ग्रुपच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

0 458

वणी: हेलपींग हँड ग्रुपच्या वतीने येत्या 14 जानेवारी रविवारी यात्रा मैदानातील हनुमान मंदिरात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा नि:शुल्क आहे. या संधीचा जास्तीत जास्त विध्यार्थ्यानी लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे. पहिला गट हा वर्ग 5 ते 10 असून दुसरा गट हा खुला आहे. अ गटात प्रथम बक्षीस 3000/- रुपये, दुसरे बक्षीस 2000/- रुपये आहे. तर खुल्या गटात म्हणजे ब गटात प्रथम बक्षीस 3000/- रुपये आहे.

या स्पर्धेसाठी नोंदणीची गरज आहे. नोंदणीची अंतिम तारीख 12 जानेवारी असून अधिक माहितीसाठी 9730292827 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.