आंबेडकर चौकात राजस्थानी महिला मंडळतर्फे पाणपोई सुरू

18

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठवड्यापासून वणी परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. वणीतील बाजार पेठेत ग्रामीण भागातून खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात. उन्हामुळे त्यांना पिण्याच्या पाण्याची गरज भासते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राजस्थानी महिला मंडळाने मोफत पाणपोई सुरू केली आहे. आंबेडकर चौक येथे जोरावरमल रुपचंद या भांड्याच्या दुकानासमोर ही पाणपोई सुरू करण्यात आली. शनिवार 4 मार्च रोजी राजस्थानी महिला मंडळच्या अध्यक्षा मधु कोचेटा, संजुलता कोठारी व वरिष्ठ समाजसेविका राणानुर सिद्दीकी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी राजस्थानी महिला मंडळाच्या उपाध्यक्ष विजया मुणोत, सचिव समता चोरडिया, कोषाध्यक्ष संगीता खटोड, तरुणा जैन, चंचल मुथा, विद्या मुथा, हेमा अग्रवाल, राखी वर्मा, आरती मुणोत, मीना मुणोत, मनीषा कटारिया प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन समता चोरडिया व आभारप्रदर्शन संगीता खटोड यांनी मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.