मारेगाव येथे ज्येष्ठ नागरिक भवनाचा लोकार्पण सोहळा

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची प्रमुख उपस्थिती

15

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथील ज्येष्ठ नागरिक भावनाचा लोकार्पण सोहळा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते संपन्न झाला. श्री. सद्गुरू जगन्नाथ महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मारेगाव नगरपंचायतचे अध्यक्ष डॉ. मनिष मस्की, उदघाटक म्हणून आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, प्रमुख अतिथी म्हणून इंदु किन्हेकर माजी नगराध्यक्षा, शंकरराव मडावी, नगरसेवक, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णराव माकोडे, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर देशमुख, लक्ष्मण ईद्दे, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे,गजानन विधाते, नितीन वासेकर, गुलाबराव मडावी, आणि मारेगाव तालुका ज्येष्ठ मंडळाचे अध्यक्ष मारोतराव ठावरी उपस्थित होते. यावेळी मान्यवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन जिजा वरारकर यांनी, प्रास्ताविक भास्करराव धानफुले यांनी तर उपस्थितांचे आभार बी. एन. ढोके यांनी मानले. यावेळी नामफलकाचेही अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ मंडळ सदस्य तसेच नागरिकांची उपस्थिती होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.