वेगाव येथे घराला भीषण आग, शेतक-याचे मोठे नुकसान

घरातील सर्व सामान जळून खाक... या कारणामुळे लागली आग

72

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील वेगाव येथील एका घराला भीषण आग लागली. गुरुवारी दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्यात मोठ्या प्रमाणात घरमालकाचे नुकसान झाले आहे.

वेगाव येथे तुकाराम वैद्य हे राहतात. सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांचे घराला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व फर्निचर जळून खाक झाले. आग लागल्याचे कळताच शेजा-यांनी आग विझवण्यासाठी पाणी टाकून प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही.

या आगीत तुकाराम वैद्य यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती वैद्य यांनी दिली. वैद्य यांची परिस्थिती बेताचीच असल्याने घटनेचा पंचनामा करून त्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

हे देखील वाचा: 

नागपुरातील मिहान व समृद्धी हायवे लगत NMRDA मंजूर प्लॉट 9.99 लाखात

न्यू रसोई (प्युर वेज) रेस्टॉरन्ट ग्राहकांच्या सेवेत

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.