बुरांडा(खडकी) येथे शेतकऱ्याचा मृत्यू 

0 579

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बुरांडा(खडकी) येथील एका शेतकऱ्याचा घरी अचानक मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

मारेगाव तालुक्यातील बुरांडा(खडकी) येथील राजेंद्र कवडू नांदे (३४) हा वडिलोपार्जित तीन एकर शेती करित होता. त्याला तीन वर्षापासून नापिकी होत असल्याचे समोर आले असुन त्यांच्या कडे काही गटाचे व बँकेचे कर्जे असल्याची माहिती कुटुंबियांनी सांगितली.

नांदे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहे. शेतकऱ्याच्या मृत्यू संदर्भात माहिती मारेगाव पोलिस घेत असुन, त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली की अकस्मात मृत्यू झाला हे वैद्यकीय अहवाला नंतर समजेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.