भास्कर राऊत, मारेगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे मारेगाव तालुका उपाध्यक्ष दयालाल रोगे यांच्या मातोश्री सुंदराबाई रोगे यांचे आज दि. 7 डिसेंबरला वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 90 वर्षाच्या होत्या. अत्यंत सुस्वभावी व मनमिळाऊ म्हणून परिचित असलेल्या सुंदराबाई यांच्या पश्चात संतोष रोगे, दयालाल रोगे ही दोन मुले आणि तीन मुली, सुना, जावई आणि नातवंड असा बराच मोठा अप्तपरिवार आहे. त्यांचेवर आज दि.7 डिसेंबरला दुपारी 12 वाजेनंतर घोडदरा येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.