दुचाकी अपघातात वागदरा येथील युवक ठार

वणी वरोरा मार्गावर सावर्ला उड्डाण पुलावरील घटना

23

जितेंद्र कोठारी, वणी : दुचाकीच्या अपघातात वागदरा दरा (नवीन) येथील तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवार 25 नोव्हेंबरच्या रात्री 6.30 वाजता सुमारास वणी वरोरा मार्गावर सावर्ला उड्डाण पुलावर हा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी राजू विनायक उईके (32) रा. वागदरा (नवीन) याचा उपचारादम्यान वणी ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता सावर्ला उड्डाण पुलावर दुचाकीचा अपघात झाला. यावेळी गंभीर जखमी अवस्थेत युवकाला नागरिकांनी 7.30 वाजता वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमीच्या डोक्याच्या मागच्या भागात मार लागून अतिरक्तस्त्राव झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र काही वेळाने जखमी युवकाचा मृत्यू झाला.

अपघातात अज्ञात युवकाची मृत्यूची बातमी फोटोसह सोशल मीडियावर व्हायरल झाली. मृत युवक वागदरा येथील राजू उईके असल्याची ओळख शनिवारी सकाळी पटली. मृतकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार राजू रोजमजुरी काम करत होता. शुक्रवारी सकाळी कामावर गेलेला राजू सायंकाळी परत घरी आलाच नाही. मृतक राजू जवळ दुचाकी नसताना तो सायंकाळी कोणासोबत दुचाकीवर जात होता ? तसेच धडक देणारी दुचाकी कुठली आहे ? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

अपघातात ठार राजू उईकेच्या मागे आई, वडील, पत्नी व दोन लहान मुलं आहे. मृतकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखला केला आहे.

हे देखील वाचा:

सलग दुस-या दिवशी उभ्या ट्रकवर मागून धडकली दुचाकी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.