T-20 फायनल मॅचवर वणीत बेटिंग… पोलिसांची अड्ड्यावर धाड

पंटरला अटक, मुद्देमालासह विविध वस्तू जप्त

17

विवेक तोटेवार, वणी: वणीत स्थानिक गुन्हे शाखेद्वारे आठवडाभरात दोन कारवाया करण्यात आल्या. त्यानंतर वणी पोलीस जागे झाले व टी 20 फायनल सामन्यावर बेटिंग करणाऱ्यांवर 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान वणी पोलिसांद्वारे कारवाई करण्यात आली. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली व 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वणी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर वणी पोलिसांनी शास्त्रीनगर येथील अनवर खान पठाण यांच्या घरी झडती घेतली. त्यांच्या घरी टेरिसवर काही इसम लॅपटॉप घेऊन इंग्लड विरुद्ध पाकिस्थान सामन्यावर क्रिकेट बेटिंग करत असल्याचे दिसून आले. येथून अफसर खान अनवर खान पठाण (35) रा. शास्त्रीनगर, इरफान खान अनवर खान पठाण (37), सैय्यद रिजवन सैय्यद रियाज (22) यांना अटक करण्यात आली.

त्यांना या क्रिकेट बेटींगच्या मालकाचे नाव विचारले असता त्यांनी पोलिसांना याबात माहिती दिली. तसेच मालक कमिशन देत असल्याचे सांगितले. यांच्याकडून 5 मोबाईल, लॅपटॉप व नगदी असा एकूण 77 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यांच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियम 4, 5 सहकलम 109 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर घटनेत आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच वाढीव कलम होऊ शकते. फरार मालकाला अद्यापही अटक करण्यात आली नाही. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक माया चाटसे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.