शाळा क्रमांक 8 मध्ये विद्यार्थ्यांसाठी बँकेविषयी जनजागृती कार्यक्रम

युनियन बँकेतर्फे विद्यार्थ्यांना बँकविषयी मार्गदर्शन

12

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सतर्कता जागरूकता अभियाना अंतर्गत युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखा वणी तर्फे स्थानिक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 8 वणी येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किशोर चौधरी हे होते तर मार्गदर्शक म्हणून युनियन बँकेचे शाखाप्रमुख लौकिक बायस्कर हे होते. प्रफुल्ल आयटवार व नितीन घाटे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहार व नागरिकांचे अधिकार याबाबत लौकिक बायस्कर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बँकेतर्फे विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. या कार्यक्रमाला शिक्षिका सुनीता जकाते व किरण जगताप या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र खरवडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन नितीन घाटे यांनी मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.