शहरात डेंगू प्रतिबंधित औषधाची फवारणी करा, प्रहारची मागणी

मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

12

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात पावसाळ्यामुळे डेंगूच्या रुग्णात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात डेंगू प्रतिबंधित औषध करावी अशी मागणी प्रहार जनशक्तीतर्फे करण्यात आली आहे. याबाबत प्रहारच्या महिला शहरअध्यक्ष प्रेरणा काळे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. पावसाळा आल्यावर शहरात डासांमुळे मोठ्या प्रमाणात डेंगू आणि मलेरियाची साथ येते. यात अनेकांना जीव देखील गमवावा लागू शकतो. त्यामुळे याबाबत नगरपालिकेने योग्य पाऊल उचलत शहरातील संपूर्ण वार्डात डेंगू प्रतिबंधित औषधांची फवारणी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.