भद्रावती येथील युवकाची दुचाकी आंबेडकर चौक येथून लंपास

वणी शहरात दुचाकी चोरट्यांचा पोलिसांना आव्हान

11
जितेंद्र कोठारी, वणी : भद्रावती येथून कामानिमित्त वणी येथे आलेल्या युवकाची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लांबविली. सदर घटना 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता येथील आंबेडकर चौक भागात घडली. याबाबत दुचाकी मालक आदर्श देवराव कांबळे (34) रा. शिवाजी नगर भद्रावती, जि. चंद्रपूर यांनी बुधवार 7 सप्टेंबर रोजी वणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
तक्रारदार  3 सप्टें. रोजी आपल्या हिरोहोंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्र. (MH34AF7649) ने कामानिमित्त वणी येथे आला होता. सायंकाळी 6.30 वाजता आंबेडकर चौक परिसरात दुचाकी उभी करून साई कॉम्प्युटर येथे गेला होता. काम आटोपून सायंकाळी 7.15 वाजता दुकानातून बाहेर निघाला असता ठेवलेल्या ठिकाणी मोटरसायकल दिसून आली नाही. तक्रारीवरून वणी पोलिसांनी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकी चोरट्यांचा छडा लावण्याचा आव्हान
शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्याबरोबरच चोरट्यांचा शोध घेणे वणी पोलिसांसाठी आव्हान आहे. मागील एका वर्षात दुचाकी चोरीच्या शेकडो घटना शहरात घडली. मात्र वणी पोलीस दुचाकी चोरीची तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आरोप होत आहे. दुचाकी चोरट्यांचा रडारवर हिरोहोंडा स्प्लेंडर, पेशन आणि शाईन मोटरसायकल असून दुचाकी वाहन मालकांच्या मनात दुचाकी चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.