जितेंद्र कोठारी, वणी: बोरगाव (मेंढोली) येथील एका 32 वर्षीय तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला. प्रफुल्ल अर्जून गाडगे असे मृतकाचे नाव आहे. तो दोन दिवसांपासून गावातून बेपत्ता झाला होता. अखेर शुक्रवारी रात्री गावातीलच एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. प्रफुल्ल हा गतीमंद होता तसेच दारुच्या आहारी गेल्याची माहिती आहे. घरी तो एकटाच राहायचा. मिळेत ते काम करायचा. तो दोन दिवसांपासून गावातून बेपत्ता झाला होता. शुक्रवारी रात्री गावातील विहिरीत एक मृतदेह तरंगताना काही लोकांना आढळून आला. सदर मृतदेह हा प्रफुल्लचा असल्याचे गावक-यांच्या निदर्शनास आले. गावक-यांनी याची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.