सोमवारपासून शेतकऱ्यांसाठी भाग्यशाली ड्रॉ योजना सुरू

शेतकऱ्यांना दर आठवड्याला बाईक जिंकण्याची संधी

0 498

निकेश जिलठे, वणी: वणीतील खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती महाविरा अॅग्रीकेअर प्रा. लि. निळापूर रोड, लालगुडा द्वारा सोमवारी 11 डिसेंबरपासून शेतकऱ्यांसाठी साप्ताहिक लकी ड्रॉ योजना सुरु करण्यात येत आहे. या लकी ड्रॉ द्वारे शेतक-यांना दर आठवड्याला एक बाईक जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी खासगी बाजाराचे नोंदणीकृत खरेदीदारांना शेतमाल विक्री केल्यानंतर शेतमाल विक्रीची मूळ पट्टी दाखवून महाविरा अग्रीकेअर प्रा. लि. च्या कार्यालयातून लकी ड्रॉ कुपन घेता येईल. शेतकऱ्यांनी आपला कापूस, सोयाबीन, तूर व इतर शेतमाल खासगी बाजार समिती मार्फत व्यापाऱ्यांना विक्री करावे यासाठी ही ड्रॉ योजना सुरू करण्यात आली आहे.

दि. ११ डिसे. ते १६ डिसे. पर्यंतच्या कालावधीत कापूस, सोयाबीन व इतर पिकांच्या विक्रीवर पहिला लकी ड्रॉ दि. १७ डिसे. रोजी काढण्यात येणार आहे. तसेच दुसरा लकी ड्रॉ २४ डिसे. २०१७ ला, तर तिसरा लकी ड्रॉ १ जाने. २०१८ रोजी काढण्यात येईल. भाग्यशाली विजेत्याला महाविरा अॅग्रीकेअर तर्फे एक दुचाकी (शो रूम किंमत) पुरस्कार स्वरूप देण्यात येईल. विजेत्याला वाहनाचे कर, विमा व नोंदणी शुल्क स्वत: भरावे लागणार आहे.

सदर इनामी योजना हि केवळ शेतकऱ्यांसाठी असून इतर कोणीही या योजनेसाठी पात्र राहणार नाही. लकी ड्रॉ कुपन हे शेतकरी सभासद कार्ड असणार आहे. तसंच ते भविष्यात देखील शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.

तालुक्यातील सर्व कापूस, सोयाबीन व तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल महाविरा अॅग्रीकेअर प्रा. लि. निलापूर रोड, लालगुडा या खासगी बाजारात विक्रीस आणून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक रोशन कोठारी यांनी केले आहे.

वणी येथील महावीरा अग्रीकेअर प्रा.ली या खाजगी बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी सुरु आहे.
दररोज ६००-७०० शेतकरी आपला शेतमाल विक्री करीत आहे.

खालील खरेदीदार कापसाची खरेदी करीत आहे
१) आईफाझ कॉटन प्रोसेसर्स
२) गुलाबप्रेम अग्रो
३) हितेन ट्रेडिंग कंपनी
४) इंदिरा कॉटन प्रोसेसर्स
५) इंदिरा एक्सिम
६) मनजित फाईबर्स
७) पी वी टेक्सटाईल
८) आर के फाईबर
९) साईकृपा कॉटजीन
१०) एस बी कॉटजीन
११) श्री बालाजी फाईबर्स
१२) वैभव कोटेक्स

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.