जितेंद्र कोठारी, वणी : 18 जुलै रोजी कोणालाही न सांगता घरुन बेपत्ता वृद्धाचा अखेर छिन्नभिन्न अवस्थेत मृतदेह मिळाला. वामन जयराम येसेकार (61) रा. घोन्सा असे मृतदेह सापडलेल्या इसमाचा नाव आहे. वणी घोन्सा मार्गावर दहेगाव जवळील विदर्भा नदीच्या पुलाखाली शनिवार 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सुमारास त्याचा मृतदेह दिसून आला. मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच मुकुटबन पोलीसानी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मात्र मृतदेह छिन्नभिन्न अवस्थेत असल्यामुळे कायर प्राथ. केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करुन जागेवर शवविच्छेदन करण्यात आले. घटनेबाबत मुकुटबन पोलिसांनी मर्ग दाखल केले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.