मोहम्मद पैगंबर विषयी वादग्रस्त विधानावरुन मुस्लिम समाज आक्रमक

नुपूर शर्माच्या वक्तव्याविरोधात उद्या मुस्लिम समाजाची जनआक्रोश रैली

11

जितेंद्र कोठारी वणी : भाजपच्या नुपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. वणी शहरातील मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांनी या वक्ताव्याचा निषेध म्हणून उद्या 10 जून रोजी जनआक्रोश रैलीचे आयोजन केले आहे.

इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टीव्ही चॅनलवर केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी वादग्रस्त विधान करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचे आरोप होत आहे. नुपूर शर्मा यांनी केलेले व्यक्तव्य आणि त्याला दुजोरा देणारे नवीन जिंदल व यती स्वरूपानंद यांच्यावर कारवाईची मागणी मुस्लिम समाजाकडून होत आहे.

वणी येथील पाण्याच्या टाकीजवळ शासकीय मैदानावर शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता आयोजित जन आक्रोश रैलीमध्ये समस्त मुस्लिम समाज बांधवांनी, महिला, युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन शहर-ए-मदिना सोशल फाउंडेशन तथा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.