लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्यु. कॉलेजसाठी प्रवेश सुरू

नर्सरी ते वर्ग 12 पर्यंत शिक्षण सेवा उपलब्ध

15

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सर्वात जुनी इंग्लिश मीडियम स्कूल असलेल्या लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये सत्र 2022-23 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. नर्सरी ते वर्ग 12 वी (विज्ञान व आयटी) पर्यंत सरळ प्रवेश देणे सुरू आहे. त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. प्रवेशासाठी जन्म दाखल्याची दुय्यम प्रत, आधारकार्ड ची दुय्यम प्रत, शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) मार्कलिस्टची दुय्यम प्रत इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी स. 9 ते दु. 1 वाजेपर्यंत देशमुखवाडी येथील लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे संपर्क साधता येईल. 7378576008 या क्रमांकावरही अधिक माहितीसाठी संपर्क साधता साधता येईल. केवळ मोजक्या जागा उपलब्ध असल्याने पालकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे  आवाहन शाळा व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.