वाघाच्या हल्ल्यात कालवड ठार, रासा शिवारातील घटना

वाघाचा सातत्याने जनावरांवर हल्ला, परिसरात दहशत

13

जितेंद्र कोठारी, वणी: वाघाच्या हल्ल्यात एक कालवड ठार झाली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. गणपत बोंडे हे रासा येथील रहिवाशी असून त्यांची रासा शिवारात शेती आहे. बुधवारी दिनांक 27 एप्रिल रोजी संध्याकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे शेतात कालवड बांधली व ते घरी निघून गेले. आज सकाळी ते शेतात गेले असता त्यांना त्यांची कालवड मृत अवस्थेत आढळून आली. त्यांनी कालवडाची पाहणी केली असता त्यांना कालवडाच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा असल्याचे आढळून आले. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात कालवडाचा मृत्यू झाल्याची शंका आली. त्यांनी तातडीने याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या चमूने घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून रासा, मोहुर्ली, सुकनेगाव, विरकुंड या  भागात वाघाचा मुक्त संचार दिसून येत आहे. अनेक जनावरांचा वाघाने फडशा पाडला आहे. तर अनेकांना मुख्य रस्त्यावर, शेतात वाघाचे दर्शन झाले आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशी दहशतीत आले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.