मुकूटबन येथे महावीर जयंती जल्लोषात साजरी

भगवान महावीर भव्य शोभायात्राने वेधले नागरिकांचे लक्ष

11

जितेंद्र कोठारी, वणी: सकल जैन समाजाच्या वतीने मुकुटबन येथे गुरुवार 14 एप्रिल रोजी भगवान  महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जैन स्थानकापासून काढण्यात आलेल्या शोभायात्रेने संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष वेधले. अहिंसा परमो धर्म, महावीर का यह संदेश- जिओ ओर जीने दो, शुद्द आहार, शाकाहार असे संदेश लिहिलेली पाट्या व झेंडे हातात घेऊन बाळ गोपालही या शोभायात्रेत सहभागी झाले होते. 

गुरुवारी सकाळी येथील जैन स्थानकामध्ये णमोकार मंत्राचे जप व त्यानंतर भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेमध्ये मुकुटबन, अडेगाव, वणी, मार्किं, पांढरकवडा (ल.), शिंदोला, मोहदा, येथील स्थानकवासी जैन समुदायाचे बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मस्जिद चौक, पशु दवाखाना, गादेवार चौक ते बस स्थानक चौक मार्गे परत जैन स्थानक पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा दरम्यान महिलांनी गरबा नृत्यवर ठेका धरला होता. शोभायात्रा समाप्तीनंतर जैन स्थानक मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम व गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले.

महावीर जयंती कार्यक्रमात स्थानाकवासी जैन श्रावक संघ मुकूटबनचे वरिष्ठ श्रावक चांदमल तातेड, चंद्रभान तातेड, कचरूमल बोहरा, कोमलचंद लोढा, पुखराज सुराणा, हरगोविंद पालीवाल, पारसमल कोठारी, पारसमल आबड, गणपतलाल तातेड, प्रकाशचंद कोठारी, दिपचंद तातेड, इंदरचंद आबड तसेच कमलचंद आबड, जितेंद्र कोठारी, अनिल कोठारी, विनोद कोठारी, शांतीलाल जैन, महेंद्र पोखरणा, गौतम सुराणा तसेच मोठ्या संख्येने महिला श्राविका उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानकवासी जैन श्रावक संघाचे पदाधिकारी नरेंद्र कोठारी, विजय कोठारी, महेंद्र आबड, आनंद आबड, सुरेंद्र तातेड, राजेश तातेड, किशोर कोठारी, आशिष तातेड, मनीष सुराणा, विमल बोहरा, जितेंद्र तातेड, दिनेश पिपाडा, दीपक पालीवाल यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन दिनेश पिपाडा यांनी केले तर विमल बोहरा यांनी आभार मानले.

जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म इ.स.पूर्व 599 मध्ये कुंडलपूर, बिहारच्या राजघराण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव त्रिशला आणि वडिलांचे नाव सिद्धार्थ होते. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा भगवान महावीरांचा जन्म होणार होता, त्यापूर्वी त्यांची आई त्रिशला यांना 16 प्रकारची स्वप्ने पडली होती अशी मान्यता आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.