भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील सिंधी (कुंभा) येथे एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वैभव मारोती वैद्य (वय 25) असे मृतकाचे नाव आहे. गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते. त्याची पत्नी गर्भवती होती. ती बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी मृतक वैभव हा शेतात कामाला गेला होता. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास तो घरी परत आला होता. घरी कुणीच नसल्याची संधी साधून त्याने घराच्या सिलिंग फॅनला बायकोच्या ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. 6.30 वाजताच्या सुमारास वैभवचे आईवडील शेतातून घरी परत आले. तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलीस पाटील संतोषराव निब्रड यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. वैभवकडे 3 एकर शेती आहे. त्याच्या पश्चात आईवडील आणि पत्नी असा परिवार आहे. वैभवने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेचा तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करीत आहे. कुटुंबात काही दिवसांनी बाळ येण्याच्या आधीच वैभवने असे टोकाचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.