बेपत्ता तरुणाचा अखेर विहिरीत आढळला मृतदेह

टाकळी (कुंभा) येथील घटना, दोन दिवसांपासून होता बेपत्ता

11

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथे गावातील एका विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. राहुल सुरेश ठोंबरे असे मृतकाचे नाव असून तो घटनेच्या दोन दिवसांआधीपासून बेपत्ता होता. राहुलने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथील राहुल सुरेश ठोंबरे सुमारे वय 24 हा दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. राहुलच्या कुटुंबीयांनी राहुल याचा शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही. मात्र सोमवारी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास गावातील एका विहिरीमध्ये राहुलचा मृतदेह आढळून आला.

आत्महत्या की घातपात?
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी राहुलचा मृतदेह विहिबाहेर काढला. घटनेचा पंचनामा करून पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद केली. मात्र राहुलच्या मृत्यूने गावात आत्महत्या की घातपात याबाबत सध्या चर्चेला उधाण आले आहे. राहुलच्या पश्चात आई, वडील, एक मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे.

हे देखील वाचा:

वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम व सर्वात मोठी पाणीटंचाई

भरदिवसा वणीत रंगला थरार, हल्लेखोरांचा चाकू घेऊन पाठलाग

दोन दुचाकीची समोरासमोर धडक, एक ठार तर दोन जखमी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.