राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नांदेपेरा येथे शाखा स्थापन

रामा कोल्हे यांची अध्यक्ष तर सचिव म्हणून विकास खोले यांची निवड

10

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील नांदेपेरा येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शाखा स्थापन करण्यात आली आहे. चंद्रज्योती शेंडे उपसभापती पंचायत समिती वणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी नांदेपेरा शाखेचे अध्यक्ष म्हणून रामा कोल्हे, उपाध्यक्ष प्रवीण खोले तर सचिव म्हणून विकास खोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी संत रविदास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी विभागीय अध्यक्ष रवींद्र धुळे, प्रमुख पाहुणे यवतमाळ जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे, गावचे सरपंच विलास चिकटे, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण खामनकर, सुखदेव येरेकार, भास्कर खोले, पांडुरंग खोले, पंढरी बोधे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश शेंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नांदेपेरा शाखा संपर्क प्रमुख देविदास खोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधव व समाजातील महिलांनी व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विनोद ढेरे, किशन कोरडे, श्याम गिरडकर, पंकज वादेकर यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.