जैताई मंदिराचे पुजारी साधुबुवा संताणे यांचे निधन

आज मोक्षधाम येथे होणार अंत्यसंस्कार

9

 

जितेंद्र कोठारी,वणी: येथील जैताई माता देवस्थानचे पुजारी साधूबुवा संताणे (88) यांचे बुधवार 26 जाने. रोजी रात्री 8 वाजता निधन झाले. मागील दोन महिन्यां पासून ते आजारी होते. वर्धा येथे त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. जैताई देवस्थानच्या जिर्णोद्धारापासून गेली 50 वर्षे ते मातेच्या सेवेत होते.

बुधवारी सायंकाळी 5 वाजता त्यांना वर्धा येथून वणी आणण्यात आले. मात्र रात्री 8 वाजता जैताई मंदिर परिसरातील कक्षात त्यांनी अखेरचे श्वास घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, जावई, नातवंड आणि त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक भाविक आहेत. त्यांची अंत्ययात्रा जैताई मंदिरातून आज गुरुवारी सकाळी 11 वाजता निघणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.