फेसबुकवरून विवाहित लैलाशी प्यार, मजनूचा घरी जाऊन अत्याचार

पंचशील नगर येथील फेसबुक फ्रेंडला अटक

12

जितेंद्र कोठारी, वणी : लग्न झालेली असताना ती फेसबुकवरून मैत्री झालेल्या तरुणाच्या प्रेमात पडली.  दोन्ही एकाच शहरात राहत असल्यामुळे संधि मिळताच दोघ भेटायच. तिचा नवरा घरी नसल्याची संधि साधून तो तिच्या घरी जायचं. यातच दोघांमध्ये शारीरिक संबंध प्र्स्थपित झाले. तिच्या घराची आर्थिक परिस्थिति हेरून तो तिच्या मुलीची सांभाळ करण्याची व इतर मदत करण्याचे आमिष दाखवून सतत अत्याचार करायाचा. मात्र बुधवार 20 जानेवारी रोजी 21 वर्षीय विवाहित तरुणीने  वणी पोलिस ठाण्यात फेसबुक फ्रेंड विरोधात बळजबरीने अत्याचार केल्याची तक्रार नोंदविली. त्यावरून पंचशील नगर भागातून मयूर उर्फ साजिद खान साहेब खान पठाण (24) या युवकाला अटक करण्यात आली. 

प्राप्त महितीनुसार विवाहित तरुणीला काही दिवसांपूर्वी  पंचशील नगर भागात राहणार्‍या मयूर उर्फ साजिद खान यांनी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली.  तिन नकळत रिक्वेस्ट एक्सेप्टही केली. त्यानंतर तो नेहमी तिला मेसेज करायचं. हळू हळू दोघांमध्ये ओळख होऊन प्रेम संबंध निर्माण झाले. दिनांक 6 जानेवारी रोजी पीडितेचा पती घरात नसल्याची संधी साधून सायंकाळी 5 वाजता दरम्यान तिच्या घरी पोहचला. त्यावेळी पीडिता तिच्या दोन मुलीसह घरात होती.  मयूर ने पीडितेला मुलीचा सांभाळ करून लग्न करण्याचे आमिष दाखवून बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. अशी  तक्रार विवाहित तरुणीने गुरुवारी रात्री वणी पोलिस ठाण्यात नोंदविली. 

तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मयूर उर्फ साजिद खान रा. पंचशील नगर विरुद्द भा. दं. वि. कलम 376, (2)(N), 417, 506 प्रमाणे  गुन्हा नोंद करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सपोनि शाम सोनटक्के यांचे मार्गदर्शनात  पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हिरे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.