विद्यानगरीत विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या

का उचललं तरुणाने आत्महत्येचं पाऊल ?

0 928

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विद्यानगरीतील विवाहित तरुणाने सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

चिखलगाव ग्रामपंचायत च्या हद्दीत येणाऱ्या विद्यानगरी येथील महेश बंडू टोंगे 27 या विवाहित तरुणाने स्वतःच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी साडेसहा चे सुमारास उघडकीस आली. घरात कोणी नसतांना महेश नि गळफास लावला. तो व त्याची पत्नी वेगळे राहतात. चहा कॅटिंगचा व्यवसाय करणारी आई व सतीश नावाचा लहान भाऊ हे दोघे मिळून वेगळे राहतात.

महेशने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच जमादार आंनद अलचेवार विकास धडसे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व महेश मृतदेह पुढील तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.