पहापळ येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम

प्रसिद्ध वक्ते बाळासाहेब गावंडे यांचे व्याख्यान

0 433

ज्योतिबा पोटे, मारेगाव: क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त पहापळ येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. समस्त गावक-यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनामिक बोढे अध्यक्ष मराठा सेवा संघ हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बाळासाहेब गावंडे, यवतमाळ होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारत महाराज आत्राम, पत्रकार ज्योतिबा पोटे, किशोर बोढे हे होते.

यावेळी गावक-यांच्या वतीने पहापळ येथील आपल्या हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन विस्तार अधिकारी झालेल्या सुरेश पाझारे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे बहारदार संचालन अमोल गुरनुले यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्तविक विस्तार अधिकारी सुरेश पाझारे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक बाळासाहेब गावंडे यांनी बिरसा मुंडा यांचा रोमहर्षक इतिहास उपस्थित गावक-या समोर मांडले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.