वणीत कर्मवीर दादासाहेब कन्नमवार जयंती उत्साहात साजरी

कर्मवीरांच्या शासकीय जयंतीसाठी लढा उभारण्याचा ठराव

16

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य संग्राम सैनिक कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची 112 वी जयंती 10 जानेवारी 2022 (सोमवार) रोजी सकाळी 9.30 वाजता कन्नमवार चौक, वणी येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बेलदार समाज बहूउद्देशीय संस्था वणीचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार होते तर प्रमुख पाहुणे माजी आमदार वामनराव कासावार होते. यांच्यासह संस्थेचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक राकेश बुग्गेवार, समाजाचे जेष्ठ समाजसेवक गजानन गट्टेवार यांची देखील प्रमुख उपस्थिती यावेळी होते.

यावेळी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या शासकीय जयंती करिता राज्यभर आंदोलन उभारण्यासंदर्भात ठराव घेण्यात आला. बेलदार समाज बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार यांनी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचा प्रचार व प्रसार विविध पद्धतीने महाराष्ट्र भर करू असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन राकेश बरशेट्टीवार यांनी केले. तर प्रास्ताविक गजानन चंदावार यांनी केले. उपस्थितांचे आभार विशाल बोरकूटवार यांनी मानले.

या कार्यक्रमात ज्ञानेश्वर बोनगिरवार, विठ्ठल पडलवार विनोद महाजनवार, रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे, महिला कार्यकारीणी अध्यक्ष अल्काताई दुधेवार, शहर कार्यकारिणी अध्यक्ष संदीप मुत्यलवार, ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीचे समन्वयक प्रवीण खानझोडे, अनिल ठाकूरवार, भैय्याजी बदखल, काँग्रेस सेवादलचे भाऊराव गेडाम, प्रवीण येलपूलवार, राजू बोईनपेल्लीवार, विलास चिट्टलवार, अमोल बुग्गेवार, राजूभाऊ धावंजेवार, अनिकेत कुचेवार,

काँग्रेस शहर अध्यक्ष प्रमोद लोणारे, अविनाश पोचमपेल्लीवार, सुनील मुत्यलवार, सुरेश चिट्टलवार, दिगांबर पालमवार, काजल पुरमशेट्टीवार, रसिकाताई बेझलवार, वैशाली मारगमवार, सुवर्णाताई बेझलवार, प्रितीताई आकुलवार तसेच बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणी, युवा बेलदार शहर कार्यकारिणी, वणी, बेलदार समाज महिला कार्यकारिणी वणीचे सर्व पदाधिकारी तथा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा:

मुख्यमंत्री होण्यापूर्वी “ते” वणी, माजरीला विकायचे किरकोळ सामान….

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.