अपघात: ट्रकची दुचाकीला धडक, युवक ठार

राजूर फाट्यावरील घटना

12

जितेंद्र कोठारी, वणी: सिमेंट वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना गुरुवार 6 डिसें. रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान राजूर फाटा येथे घडली. या अपघातात गंभीररित्या जखमी दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू झाला. शाबीर दस्तगीर शहा (23) रा. राजूर (कॉलरी) असे मृत युवकाचे नाव आहे. घटनेनंतर वणी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतले असून ट्रक चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार राजूर येथील शाबीर शहा हा तरुण मावशीच्या मुलीच्या लग्नात शामिल होण्यासाठी मोटारसायकलने घरुन निघाला होता. राजूर फाट्यावरून यवतमाळ-वणी महामार्गावर वळण घेत असताना यवतमाळच्या दिशेने जात असलेल्या सिमेंटवाहक ट्रक (MH29 BE4186) च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दुचाकीस्वार शाबीर गंभीररीत्या जखमी झाला. दुर्घटनेनंतर चालक ट्रक सोडून पळून गेला.

जखमी युवकाला वणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर रेफर करण्यात आले होते. मात्र चंद्रपूर येथे उपचारादरम्यान जखमी शाबीरचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. वणी पोलिसांनी अपघातास जवाबदार ट्रक चालकाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात स.फौ. सुदर्शन वानोळे करीत आहे.

हे देखील वाचा:

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.