शेतात तरुणाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणी येथील घटना, नुकतेच जुळले होते लग्न

9

रमेश तांबे, वणी: तालुक्यातील ब्राम्हणी येथील एका तरुणाने शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्यहत्या केली. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. नितीन महादेव मंगाम (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

नितीन हा सकाळी आपल्या शेतात कामासाठी गेला. काही वेळाने त्याचे वडील सुध्दा शेतात गेले. मात्र त्यांना शेतात नितीन खाली पडलेला दिसला. त्यांनी शेजारच्या लोकांच्या मदतीने नितीनला वणीतील एका खासगी रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

नितीनला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितीन यांचा विवाह जुळला असल्याची माहिती मिळाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. संजय मंगाम रा. ब्राह्मणी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

धक्कादायक: मोमिनपु-यात चिमुकल्यावर पुन्हा द्रव्य हल्ला

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.