मोमिनपुरा येथे चिमुकल्यावर अॅसिड अटॅक

दोन दिवसात दुसरा हल्ला, परिसरात एकच खळबळ

12

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मोमीनपुरा येथे आज दिनांक 26 डिसेंबर रविवार सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास एका 5 वर्षीय चिमुकल्यावर ऍसिड फेकल्याची घटना घडली. सदर अॅसिड हे बॅटरी वॉटर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत चिमुकल्याला जखम झाली नसली तरी यामुळे खळबळ उडाली आहे. 

मोमीनपुरा परिसरात शफीउल्ला खान हे आपल्या परिवारासह राहतात. ते रोजमजुरीचे काम करतात. त्यांना एक मुलगा उझेब (8) व मुलगी अश्फानाझ (5) आहेत. 25 डिसेंबर सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास एका अज्ञात माथेफिरुकडून मुलगा उझेब याच्यावरही असाच हल्ला झाला होता. परंतु जखम गंभीर नसल्याने पालकांनी पोलिसात तक्रार दिली नाही.

दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मुलगी अश्फानाझ ही मोमीनपुरा येथील आईस फॅक्टरी जवळ खेळत असतांना एका अज्ञात इसमाकडून तिच्यावरही असाच ऍसिड हल्ला करण्यात आला. तिच्या गळ्यावर जळजळ होत असल्याचे पालकांना सांगितले. पालकांनी त्वरित वणी पोलीस ठाणे गाठले. प्रकरणाचा वणी पोलीस तपास करीत आहे.

हे देखील वाचा:

सायकलीस्ट प्रणाली चिकाटे हिचे सोमवारी वणीत आगमण

दारुच्या पव्व्याने केला घात, अपघातात काच पोटात जाऊन तरुणाचा मृत्यू

मार्डी-खैरी रोडवर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, एक ठार तर एक गंभीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.