दुचाकी चोरली, मात्र नेताना चोरट्यांचे फुटले बिंग

रंगेहात आढळली दुचाकी चोरट्यांची टोळी, जत्रा रोड परिसरातील घटना

10

जितेंद्र कोठारी, वणी: सिनेमा बघायला आलेल्या प्रेक्षकाची दुचाकी चोरणा-या दोन चोरट्यांना नागरिकांनी रंगहात पकडले. बुधवारी रात्री ही घटना घडली. प्रतीक विनायक भगत (23) व रोशन भीमराव मून (27) असे आरोपींचे नावे असून हे दोघेही वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वाशी येथील रहिवाशी आहे. 

सविस्तर वृत्त असे की अमित झिले हा तरुण जत्रा रोडवरील एका टॉकीजमध्ये रात्री 9 ते 12 चा शो बघण्यासाठी गेला होता. त्याने त्याची दुचाकी (MH29 Y4702) टॉकीजसमोरील मोकळ्या जागेत उभी ठेवली व तो टॉकीजमध्ये गेला. रात्री 11 वाजताच्या दरम्यान आरोपी प्रतीक व रोशन हे अमितची दुचाकी चोरण्यासाठी गेले. त्यांनी गाडीचे हँडल लॉक तोडले व गाडीला धक्का मारत ते दोघे गाडी चोरून नेत होते.

ही बाब टॉकीजच्या एका कर्मचा-याला लक्षात आली. त्याने याची माहिती टॉकीजच्या संचालकास दिली. संचालकाने याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान टॉकीजचे कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी चोरट्यांजवळ जाऊन त्यांना रोखून ठेवले. पोलीस त्या वेळी त्याच परिसरात गस्तीवर होते. ते लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही चोरट्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले.

या प्रकरणी वणी पोलीस आणखी किती दुचाकी या चोरट्यांनी चोरली याचा तपास करीत आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून दुस-या गावातील चोरटे हे वणीत येऊन दुचाकी चोरताना आढळून आले होते. काही दिवसांआधी वरोरा येथून अटक झालेल्या एका चोरट्यांनी वणीतून अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती.

हे देखील वाचा:

83: भारताच्या वर्ल्डकप विजयाचा रोमाचकारी प्रवास

प्रेयसीनेच भाटव्याच्या मदतीने केला प्रियकराचा खून

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.