एका महिलेची दुस-या महिलेस मारहाण

रोहपट येथील घटना, हिस्सेवाटणीवर झाला वाद

13

सुरेश पाचभाई, बोटोणी: शेतीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून एका महिलेने दुस-या महिलेला काठीने मारहाण केली. यात महिला जखमी झाली. मारेगाव तालुक्यातील रोहपट येथे ही सोमवारी ही दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

राधाबाई बापूराव आत्राम (50) या मारेगाव तालक्यातील रोहपट येथील रहिवाशी आहे. त्यांची गावालगतच शेती आहे. तिच्या घराशेजारील आरोपी पंचफुला लक्ष्मण आत्राम (55) ही राहते. या दोघींचेही शेत शेजारी शेजारी आहे. या दोन कुटुंबामध्ये शेतीच्या हिस्सेवाटणीवरून वाद सूरू आहे.

दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान राधाबाई या शेतात चालल्या होत्या. दरम्यान रस्त्यात त्यांना पंचफुला यांनी गाठले व त्यांच्याशी शेतीच्या हिस्सेवाटणीवरून वाद घातला. या वादात पंचफुला हिने राधाबाईला मारहान करत शिविगाळ केली. तसेच राधाबाईच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.

या प्रकरणी मंगळवारी राधाबाईने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी पंचफुला लक्ष्मण आत्राम हिच्याविरोधात भादंविच्या कलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

जम्बो पक्ष प्रवेशाने काँग्रेसमधली मरगळ दूर होणार ?

पंचशील नगर मागील एका घराला भीषण आग

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.