दुचाकीला ट्रकची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

राजूर फाट्याजवळील घटना

11

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर फाट्याजवळ एका दुचाकीला ट्रकने जबर धडक दिली. यात दुचाकीचालक जागीच ठार झाला. मोहन नानाजी जांभुळकर (50) असे मृताचे नाव आहे. मोहन हे मारेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवाशी होते. ते बोटोनी जवळील कोठोडा येथे त्यांच्या सासुरवाडीत राहत होते. पाटाळा येथील एका खासगी वॉटर प्लॉन्ट मध्ये ते नोकरी करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. नोकरीनिमित्त ते रोज कोठोडा ते पाटाळा त्यांच्या दुचाकीने ये-जा करायचे.

आज संध्याकाळी मोहन हे त्यांची दुचाकी (MH 29 AP2164) ने ते कोठोडा येथे परत जाण्यासाठी निघाले. 8 वाजताच्या सुमारास राजूर फाट्याजवळील टर्निंगवर त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने जोरदार धडक दिली. यात ते जागीच ठार झाले. धडक देऊन चालक ट्रक घेऊन पसार झाला.

दरम्यान रस्त्यावरच्या लोकांना अपघात झाल्याचे आढळले. त्यांनी थांबून ओळखपत्र तपासले असता त्यांच्या खिशातील आधारकार्डवरून त्यांची ओळख पटली. वणीहून काही लोक तात्काळ घटनास्थळी गेले. दरम्यान एका ऑटोतून त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मोहन यांच्या पश्चात पत्नी व 3 मुली आहे.

हे देखील वाचा:

मछिंद्रा-मार्डी रोडवर अपघातात दोघे जखमी, एक गंभीर

मारेगाव (कोरंबी) येथील विवाहित तरुण 3 दिवसांपासून बेपत्ता

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.