म्हैसदोडका येथे युवकाची आत्महत्या

विषारी कीटकनाशक घेऊन संपविली जीवनयात्रा

10

भास्कर राऊत, मारेगाव: म्हैसदोडका येथील एका युवकाने विषारी कीटकनाशक द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविले. आकाश गोविंदा सहारे वय 25 असे मृत युवकाचे नाव आहे. आकाशने गुरुवारी रात्री विष प्राषन केले होते.

मारेगाव तालुक्यात आत्महत्या ह्या नेहमीच्याच झालेल्या आहेत. आठवड्यात दोन ते तीन घटना घडतच असतात. अशातच मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील अविवाहित आकाश या युवकाने दि. 9 डिसेंबरला गुरुवारी सायंकाळी 7.30 च्या दरम्यान घरी मोनोसिल नावाचे कीटकनाशक प्राशन केले.

घरच्यांना माहिती मिळताच लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान आकाशची प्राणज्योत मालवली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. आकाशला मोठा भाऊ आणि आई आहे. आकाशचे वडीलही काही वर्षांपूर्वी एका अपघातात मृत्युमुखी पडले होते.

हे देखील वाचा:

मारेगाव (कोरंबी) येथील विवाहित तरुण 3 दिवसांपासून बेपत्ता

प्रभाग क्रमांक 3 च्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.