मारेगाव (कोरंबी) येथील विवाहित तरुण 3 दिवसांपासून बेपत्ता

शेताजवळ आढळली दुचाकी, पळसोनी येथील क्रिष्णाही अद्याप बेपत्ताच

12

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथील 35 वर्षीय विवाहित तरुण घरुन बेपत्ता झाला. संतोष वसंतराव काळे असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. दि. 7 डिसेंम्बर रोजी दुपारी 3.30 वाजतापासून संतोष बेपत्ता असल्याची तक्रार वडील वसंतराव काळे यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली आहे.

संतोषच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष वणी येथील रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्थामध्ये शिपाई पदावर काम करीत आहे. दि. 7 डिसेंम्बर रोजी संतोष आपली दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. दुपारी 3.30 वाजता दरम्यान त्याची मोटरसायकल शेताजवळ उभी आढळली. मात्र संतोष रात्रीपर्यंत घरी आला नाही. घरच्या लोकांनी संतोषच्या मोबाईल फोनवर कॉल केले असता मोबाईल स्विचऑफ येत आहे. गाव शिवारात आणि नातेवाईकांकडे शोध घेऊनही अद्याप काही सुगावा लागलेला नाही.

कुटुंबियांना काही न सांगता घरुन बेपत्ता असलेले संतोष काळेच्या कुटुंबात आई,वडील, पत्नी व 2 मुलगी आहे. संतोष कुठे आहे आणि बेपत्ता होण्यामागे काय कारण आहे? याचा शोध वणी पोलीस करीत आहे.

पळसोनी येथील क्रिष्णाही अद्याप बेपत्ताच
शाळेत जातो म्हणून घरुन निघालेला पळसोनी येथील 16 वर्षीय क्रिष्णा काकडे हा विद्यार्थी 23 नोव्हे. रोजी साई मंदिर परिसरातून बेपत्ता झाला होता. सगळीकडे शोध घेऊन अद्यापही क्रिष्णाचा काही सुगावा लागलेला नाही. तो चंद्रपूर येथे आढळल्याचे बोलले जात आहे. अद्याप क्रिष्णाचा शोध लागला नसल्याने आता संतोष देखील बेपत्ता झाला आहे. यांना शोधण्याचे आव्हान वणी पोलीस स्टेशन समोर आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.