गाडीत हवा भरण्याचे पैसे मागितले म्हणून मारहाण

सर्वोदय चौकातील घटना, तरुणाविरोधात गुन्हा दाखल

10

विवेक तोटेवार, वणी: दुचाकीत हवा भरल्यानंतर दुकान मालकाने पैसे मागितल्याच्या रागातून एका तरुणाने दुकान मालकास मारहाण केली. शहरातील सेवानगर येथे बुधवारी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी हा सेवानगर येथीलच रहिवाशी असून त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संजय बबन नागपुरे (44) रा. सर्वोदय चौक यांचे सर्वोदय चौकाजवळ सेवानगर येथे सायकल, दुचाकी दुरुस्तीचे दुकान आहे. बुधवार 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास आरोपी अंकुश राम मोगरे (30) रा. सेवानगर हा त्याच्या मित्राची दुचाकी (MH29 BS4553) घेऊन हवा भरण्यासाठी संजय यांच्या दुकानात आला. हवा मारल्यानंतर संजय यांनी आरोपी अंकुशला हवा भरण्याचे पैसे मागितले.

मात्र पैसे का मागितले म्हणून अंकुश याने दुकान मालक संजय यांच्याशी वाद घातला. वादात अंकुशने संजय यांना लथाबुक्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत संजय यांच्या तोंडावर जखम झाली आहे. संजय यांनी वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. तक्रारीवरून वणी पोलिसात भादंविच्या कलम 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

ट्रॅक्टरखाली दबून मजूराचा मृत्यू तर चालक जखमी

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे वारंवार शोषण

तडीपार गुन्हेगाराला पुरड (नेरड) येथून अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.