मनसेच्या शहराध्यक्षपदी शिवराज पेचे, गितेश वैद्य उपाध्यक्ष

मनसेच्या शहर पदाधिका-यांची नियुक्ती

11

जितेंद्र कोठारी, वणी: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील राज्यपातळी ते शाखा पातळीपर्यंत पक्षबांधणी सुरुवात केली असून वणी शहर मनसेच्या अध्यक्षपदी शिवराज पेचे तर शहर उपाध्यक्षपदी गितेश वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी शिवराज पेचे व गितेश वैद्य याना नियुक्ती पत्र दिले. पक्ष वाढीसाठी वणी मधून योग्य पदाधिकाऱ्यांची निवड होईल अशी अपेक्षा मनसे कार्यकर्त्यांची होती. तो विश्वासार्हता कायम ठेवत मनसेचे धडाडीचे युवा कार्यकर्ता शिवराज पेचे व गितेश वैद्य यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.