अश्लिल व्हिडीओ प्रकरण: राजकीय पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समावेश ? 

अश्लिल व्हिडीओ तयार करणारा व्यक्ती कोण ? 

0 1,137
रवि ढुमणे, वणी: महिलेचे लैंगिक शोषण करून तिचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंक करणा-या एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या नुकत्याच पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एका 33 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र सदर व्हिडीओ तयार करणारा कोण ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सध्या या प्रकरणाबाबत शहरात एक वेगळीच चर्चा सुरू आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयातील बडे अधिकारी तसेच राजकारणातील एक ‘सदस्य’ सामील असल्याच्या खमंग चर्चेला उत आलं आहे.
अटक करण्यात आलेला भास्कर गोरे हा कंत्राटदार म्हणून काम करतो. तो पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील बांधकामाचे कंत्राट घेतो. परिणामी त्याची अनेक कामांची देयके पंचायत समिती स्तरावर अडकलेली असल्याची चर्चा आहे. देयके मिळत नसल्यास अधिकाऱ्यांची खातरजमा करणे, त्यांना विविध आमिष दाखवणे असे अनेक प्रकार येथे चालत असतात. त्यामुळे कदाचित असाच प्रकार झाल्याची चर्चेला सध्या वणीत चांगलच उधाण आलंय.
संबंधित महिलेचे शोषण करून तिला दुचाकीवर बसवून कित्येकदा बाहेर घेऊन गेल्याचे प्रसंग बघायला मिळाले.  परंतु जेव्हा इच्छेविरुद्ध अत्याचार करण्यात आला त्यावेळी व्हिडीओ कोण काढत होता असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. पीडित महिलेला एका घरात नेऊन तिची चित्रफित तयार करीत वारंवार पैशाची मागणी करीत असल्याचे आरोप पीडितेने केले आहे.
या प्रकरणात काही पंचायत समिती मधील अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता ते अधिकारी आणि पदाधिकारी कोण ? असा प्रश्न सर्वांना भेडसावतोय. एकूणच या प्रकारात अनेक लोक सामील असण्याची शक्यता बळावली आहे. पीडितेची चौकशी करून या घटनेचा तपास महिला पोलीस अधिकारी यांनी सुरू केला आहे. आता या प्रकरणात कोण कोण सहभागी आहेत हे तपासात समोर येईलच…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.