माजी सैनिक दादाजी मत्ते यांचे निधन

सामाजिक कार्यात असायचा नेहमी सहभाग

22

भास्कर राऊत, मारेगाव: दांडगाव येथील माजी सैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते दादाजी राजेश्वर मत्ते वय 84 वर्षे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. माजी सैनिक असलेले दादाजी मत्ते हे विविध कार्यकारी सहकारी संस्था मार्डीचे 5 वर्षे सभासद होते. त्यानंतर ते मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सल्लागारपदी त्यांनी 5 वर्षे काम केले. तसेच मारेगाव तालुका खरेदी विक्री सहकारी संस्था यांचेही 5 वर्षे ते संचालक होते. यासोबतच सामाजिक कार्यामध्येही ते नेहमी अग्रेसर राहिलेले आहेत. काँग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणुनही त्यांनी परिसरात मोलाचे कार्य केले. अखेर वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.