मद्यधुंद अवस्थेत तरुणाची वृद्धाला मारहाण

बैलबंडीच्या उभारीने मारहाण, भालर येथील घटना

12

जितेंद्र कोठारी, वणी: मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने एका वृद्धाला बैलबंडीच्या उभारीने मारहाण केली. गुरुवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी भालर येथे ही घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मद्यधुंद अवस्थेत असल्याने घरी सोडून देणा-या व्यक्तीच्याच आजोबाला ही मारहाण करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार. आरोपी आशिष मधूकर वरारकर (35) हा भालर येथील रहिवाशी आहे. गावातच फिर्यादी प्रतिक केशव गौरकार (25) राहतो. गुरुवारी संध्याकाळी आशिषने दारु पिली होती. त्यामुळे प्रतिक व त्यांच्या मित्राने आशिषला घरी सोडले. मात्र मद्यधुंद अवस्थेत घरी सोडल्याचा आशिषला याचा राग आला.

काही वेळानंतर संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास आशिष हा प्रतिकचे आजोबा नामदेव घुलाराम गौरकार यांच्या घराजवळ गेला. त्यावर नामदेवने आशिषला इथे कशाला आला अशी विचारणा केली. त्याचा आशिषला राग आला व त्याने बैलबंडीच्या उभारीने नामदेव यांच्यावर हल्ला केला.

दरम्यान आजोबाला मारहाण केल्याची माहिती मिळताच प्रतिकने वणी पोलीस स्टेशन गाठले व याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी आशिष मधुकर वरारकर (35) याच्याविरोधात भादंविच्या कलम 324 व 504 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

मध्यरात्री घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.