शेलू येथे क्षुल्लक कारणावरुण युवकाला मारहाण

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

11

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शेलू (खुर्द) येथे क्षुल्लक कारणावरून एक व्यक्तीला बैलबंडीच्या उभारीने जबर मारहाण केल्याची घटना बुधवार 6 ऑक्टो. रोजी रात्री 9 वाजता दरम्यान घडली. मारहाणीत गंभीर जखमी व्यक्तीच्या पत्नीच्या फिर्यादवरुन गावतीलच 4 जणविरुद्द वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी साधना नरेंद्र थेरे (30) रा. शेलू (खुर्द) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिचे पती नरेंद्र थेरे रात्री 9 वाजता दरम्यान गावातीलच पानठेल्या उभे असताना गावातील कोंबड्या चोरीला जात असल्याबबत बोलत होते. तेव्हा आरोपी उमेश दिलीप वालकोंडावार (25), नीलेश दिलीप वालकोंडावार (30), दिलीप वालकोंडावार (55) आणि प्रकाश सर्व रा. शेलू (खुर्द) तिथे आले आणि नरेंद्रसोबत वाद करून त्याला तोंडावर आणि डोक्यावर बैलबंडीच्या उभारीने मारहाण केली.

घटनेत नरेंद्र थेरे हा गंभीर जखमी झाला असून त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. फिर्यादीची तक्रार आणि मेडिकल रिपोर्टवरुन वरील चारही आरोपीविरुदद कलम 326,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले. पुढील तपास पीएसआय शिवाजी टिपूर्णे करीत आहे.

हेदेखील वाचा:

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.