अति मद्यप्राशनमुळे बोर्डा येथील युवकाचा मृत्यू 

उपचारादरम्यान मृत्यू झाला

15

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील बोर्डा येथील एका युवकाचे अति मद्यप्राशन केल्यामुळे उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू झाला. याबाबत वणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

प्रत माहितीनुसार बोर्डा येथील महादेव शामराव सिडाम (35) यास दारु पिण्याची सवयी होती. मागील महिन्यात 27 तारखेपासून महादेव सतत दारूच्या नशेत असून दोन दिवस जेवणही केले नाही. अशातच 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता त्याची तब्येत जास्त बिघडली. कुटुंबीयानी महादेवला लगेच वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र तब्येत आणखी खालावल्याने त्याला तात्काळ चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. चंद्रपूर येथे खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान सायंकाळी 5.40 वाजता महादेवाचा मृत्यू झाला.चंद्रपूर येथील दवाखान्यातून आलेल्या सूचनेवरून वणी पोलिसांनी मर्ग दाखल केले.

हे देखील वाचा:

मालगाडीच्या धडकेने वृद्ध महिला जागीच ठार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.