मुख्याध्यापक अनिल ताजने यांचे हृदय विकाराने निधन

मारेगाव येथील शाळेत होते कार्यरत

11

तालुका प्रतिनिधी, वणी: येथील काठेड चौक परिसरातील रहिवासी अनिल बाबाराव ताजने (57) यांचे दि. 30 गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ते मारेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. गुरुवारी पहाटे अचानक त्यांची प्रकृती बिघडली. वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी अनिता, मुलगा, मुलगी, जावई, भाऊ, वहिनी असा बराचसा परिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.