वणी पोलिसांनी पकडली 50 हजारांची दारू

0 595
विवेक तोटेवार, वणी: सोमवार रात्री आपल्या कर्तव्यावर असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वणी पोलिसांनी वनीतील पेटूर गावाजवळ वाहनांची तपासणी सुरू केली .मिळालेल्या माहितीच्या आधारावर सिल्व्हर रंगाची सुमो गाडी क्रमांक एम एच 34 ए ए 6269 या वाहनास अडवून तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारूचे 20 बॉक्स आढळून आले याबाबत चालक राजू मारोती अलीवार राहणार गायकवाड फैल वणी यास वणी पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याच्याकडे मिळालेल्या मालाची किंमत 49920 व यासाठी उपयोगात आणलेल्या वाहनाची किंमत असा एकूण 2 लाख 99 हजार 920  रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात सुदर्शन वनोळे. नफिस शेख , सुनील खंडागळे , रत्नपाल मोहाडे, दीपक वंडर्सवर यांनी केली.सदर  कार्यवाहीत आरोपीवर  महाराष्ट्र दारूबंदी कायद्यनुसार 65(अ)व(इ) व सहकलम3/181 130(3)/177  नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.