सावधान… दिवसाढवळ्या बँकेसमोरून 2 दुचाकी चोरी

इंडियन बँक व स्टेट बँक समोर 2 दुचाकींवर चोरट्यांचा डल्ला

8

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दिवसाढवळ्या दुचाकी चोरीच्या घटनेत मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. बँकेसमोरून अज्ञात इसमाने दुचाकी चोरून नेल्याची दोन तक्रार सोमवार 27 सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात दाखल झाली. बँकेसमोर दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पहिल्या घटनेत रंगनाथ स्वामी पत संस्थांमध्ये अभिकर्ता पांडुरंग आनंदराव दानव (55) रा. गुलमोहर पार्क वणी यांनी दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी इंडियन बँक समोर बलकी यांच्या चहा कँटीन जवळ ठेवलेली त्यांची हिरोहोंडा स्पेलँडर प्रो (MH29AQ6298) किंमत 25 हजार अज्ञात इसमाने चोरुन नेल्याची तक्रार दाखल केली.

दुसऱ्या घटनेत दि. 9 सप्टेंबर 2021 रोजी स्टेट बँकच्या मुख्य शाखा समोर समोर उभी केलेली हिरोहोंडा एचएफ डीलक्स (MH29BG5032) किंमत अंदाजे 30 हजार चोरी झाल्याची तक्रार सुधाकर दत्तू कुटारकर (50) रा. मेंढोली, ता.वणी यांनी पो.स्टे. ला नोंदविली. वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरू केले आहे.

हे देखील वाचा:

अवैधरित्या विदेशी दारुची वाहतूक करताना एकाला अटक

अवैधरित्या विदेशी दारुची वाहतूक करताना एकाला अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.