वणीतून दुचाकी चोरून नेणा-याला अटक

वणीतून चोरल्या होत्या 3 दुचाकी

14

विवेक तोटेवार, वणी: ऑगस्ट महिन्यात वणी शहरातून विविध ठिकाणाहून तीन दुचाकी चोरीला गेल्या होत्या. याबाबत तक्रार वणी पोलिसात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी रविवारी दिनांक 19 सप्टेंबर वणी पोलिसांनी एका आरोपीस चंद्रपूर जिह्यातून अटक केली आहे. राजू उर्फ राजकुमार बालाजी धुर्वे (28) रा. अर्जुनी चारगाव ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.

आरोपीने 27, 28 व 29 ऑगस्ट रोजी शास्त्रीनगर, सुतारपूरा येथून 3 दुचाकींची चोरी झाली होती. याबाबत वणी पोलिसात तक्रार देण्यात आली होती. वणी पोलिसांनी कलम 379 नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास डोमजी भादिकर व सोमेश्वर कुमरे करीत होते. दरम्यान एका आरोपीला चंद्रपूर येथील पोलिसांनी एका वेगळ्या गुन्ह्यात अटक केले. त्यानंतर समजले की, वणी पोलिसात आरोपी राजू उर्फ राजकुमार बालाजी धुर्वे (28) याच्याविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

वणी पोलिसांनी न्यायालयीन आदेशावरून आरोपीला वणीला 19 सप्टेंबर रोजी आणले. विचारपूस केली असता चोरलेल्या तिन्ही दुचाकी त्याने आपल्या घरीच ठेवले असल्याची माहिती मिळाली. सोमवार 20 सप्टेंबर रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हे देखील वाचा:

खुशखबर… वणीत दोन दिवशीय सिनेमॅटोग्राफी प्रशिक्षण शिबिर

…आणि ईश्वरचिठ्ठीने झाला लढतीचा फैसला

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.