वणीचे तहसीलदार शाम धनमने यांची बदली

दोन दिवसांपासून तहसीलदार पद रिक्त

13

जितेंद्र कोठारी, वणी: येथील तहसीलदार शाम धनमने यांची प्रशासकीय कारणास्तव देऊळगाव(राजा) येथे बदली करण्यात आली आहे. शाम धनमनेच्या जागी कोण येणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. तहसीलदार धनमने यांची बदली झाल्यानंतर तहसीलदार पदाचा प्रभार कोणाकडे देण्यात आलेले नाही. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून वणी तहसीलदाराचे पद रिक्त आहे.

शाम धनमने 19 ऑक्टो. 2018 रोजी वणी तहसीलदार म्हणून रुजू झाले होते. कोरोना काळात वणी तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी संपूर्ण महसूल यंत्रणा कामाला लावली होती. मात्र त्यांच्या कार्यकाळात रेती माफियांना मोकळीक मिळाल्याचा ठपकाही ठेवण्यात आला. मागील एका वर्षांपासून तहसीलदार शाम धनमने वेगवेगळ्या कारणाने बहुतांश दिवस रजेवर होते. त्यामुळे प्रभारी तहसीलदाराच्या भरवश्यावर महसूल विभाग काम करीत होता.

वणी येथील अनेक विभागात कायम अधिकारी नसून प्रभारावर कामकाज सुरू आहे. आता वणी तहसीलदारपदी लवकरच नवीन तहसीलदाराची नेमणूक होईल की महसूल विभागाचा गाडा प्रभारी तहसीलदार हाकणार हे येत्या एक दोन दिवसात कळेल.

हे देखील वाचा:

खुशखबर… वणीत दोन दिवशीय सिनेमॅटोग्राफी प्रशिक्षण शिबिर

वणीत होणार पहिल्यांदाच स्टॉक मार्केट प्रशिक्षण शिबिर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.