तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील येनक येथील आदिवासी बांधवांना राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या खावटी योजनेचा लाभ मिळाला. खावटी योजनेतून एका कुटुंबास दोन हजार रुपयांचा किराणा आणि दोन हजार रुपये अनुदान देण्यात आले. आर्थिक विवंचनेतील आदिवासींना आधार देण्यासाठी राज्यसरकार द्वारा खावटी योजना राबविण्यात येते. महाराष्ट्र शासनाच्या पांढरकवडा विभागातर्फे आदिवासी खावटी अनुदानाचे वाटप येनकच्या चाळीस आदिवासींना नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी रामचंद्र टोंगे, रणजित बोंडे, अनिल गारघाटे, सुमीत सोनटक्के, राहुल पिंगे आदी उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.